शिरोळ / प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिरोळ केंद्राच्यावतीने महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार दिनांक ७ मार्च ते सोमवार दिनांक ११ मार्च २०२४ अखेर ११ फुटी शिवलिंग १२ ज्योतिर्लिंग ५ फुटी श्री शंकर आध्यात्मिक चित्र दर्शन आजी-माजी सैनिक व शेतकरी मेळावा महिला महोत्सव असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ब्रह्माकुमारीज शिरोळ केंद्राच्या संचालिका मनीषा बहेनजी व अर्चना बहेनजी यांनी दिली.
येथील कल्लेश्वर तलावानजीक असणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारीज शिरोळ केंद्राच्या शिवरचना येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार दिनांक ७ मार्च रोजी सायंकाळी ५ शिवरात्र महोत्सवाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.यानंतर शिवलिंग १२ ज्योतिर्लिंग श्री शंकराचे आध्यात्मिक चित्र दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात येणार आहे.शुक्रवारी ८ मार्च रोजी शिवरात्र असल्यामुळे दिवसभर शिवभक्तांसाठी १२ ज्योतिर्लिंग शिवलिंग आणि श्री शंकराचे चित्र दर्शनासाठी खुले असणार आहे.
शनिवार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता आजी माजी सैनिकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिनानिमित्त शेतकरी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सेंद्रिय शेती तृणधान्याचे महत्त्व याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
सोमवार दिनांक ११ मार्च २०२४ रोजी दुपारी ३ वाजता महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महिलांसाठी विविध करमणुकीचे खेळ व संगीत खुर्ची या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे
पाच दिवस महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या धार्मिक व विविध कार्यक्रमांसाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन ब्रह्माकुमारीज मनीषा बहेनजी व अर्चना बहेनजी यांनी केले आहे