आलास / प्रतिनिधी
कुमार विद्या मंदिर मराठी आलास शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.विविध नृत्यप्रकार व कलाविष्काराने प्रेक्षकांची मने छोट्या कलाकारांनी जिंकले.विशेषतःअयोध्या येथे पार पडलेल्या रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेवर आधारीत नृत्याविष्काराने परमानुभूती मिळाली.छोटया कलाकारांचे अनेकांनी बक्षिसांचा वर्षाव करुन कौतुक केले.
शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आप्पासो यळगुडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात येवून निरोप देण्यात आला.उपस्थितांनी यळगुडे यांच्या कार्याचा आढावा घेवून कौतुक केले.त्याचबरोबर शाळेची विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थिनी कुमारी अनुष्का सखाराम मोरे इयत्ता ५वी हिची जिल्हास्तरीय लांब उडी व धावणे क्रिडा प्रकारात निवड झालेबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच सचिन दानोळे,उपसरपंच सोनाली शशिकांत कोळी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अमृता दानोळे,सर्व सदस्य,शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती अशोक कोळी,माजी सभापती दिलीप शिरढोणे,गणेशवाडीचे मुख्याध्यापक राजेश खन्ना पानारी,जयानंद बेरड,संतोष शिंगाडे,
उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका जबीन मेहबूब मुजावर, ए.बी.हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष कोळेकर सर,रफिक मखमल्ला सर यांच्यासह पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजेंद्र यळगुडे,लक्ष्मण कबाडे,मेहबूब मुजावर,नाना कागले,गणपती जाधव,दिपक विटेकरी, अजित कांबळे,अनिल कांबळे,माधुरी कोरे यांनी परिश्रम घेतले.