उत्तरकार्याचा डामडौल न करता केंद्रीय शाळा कन्या शाळेस स्टेरिओ सिस्टीम भेट
नांदणी / प्रतिनिधी
मनुष्य प्राणी विचित्र स्वभावाचा आहे हे सर्वश्रृत आहे.पण याला काही लोक अपवाद ठरतात.अशाच एका सत्य घटनेची अनुभूती केंद्रीय शाळा कन्या नांदणी ता.शिरोळ या शाळेत आली.नांदणी येथील श्रीमती उषा यल्लाप्पा वडर यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांना सौ.प्रतिभा दत्तात्रय पाथरवट रा.मिरज व सौ.करुणा दिपक पवार रा.मुंबई या दोन्ही मुलीच आहेत.त्यांच्या मुली व जावयांनी समाजाला एक आदर्श स्वतःच्या कृतीतून घालून दिला.उत्तर कार्यासाठी रक्कम खर्च न करता आईच्या स्मरणार्थ शाळेतील मुलांना उपयुक्त असे स्टेरिओ सिस्टिम भेट दिला.
विशेष बाब म्हणजे यातील सौ.करुणा पवार या २०१४-२०१५ साली केंद्रीय शाळा नांदणी येथे स्वयंसेवक म्हणून अध्यापनाचे कार्य केलेले आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक करून मृतात्म्यास चिरशांती लाभावी यासाठी सर्व मुलांनी पसायदान गायिले.
या कार्यक्रमांसाठी दिपक पवार,दत्तात्रय पाथरवट या दोन्ही जावई,नांदणी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश खोत,मुख्याध्यापक अरुण कदम यांचेसह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेने अशा आदर्शवत घटनेचा आदर्श घेवून अनाथ,गरजू व सर्वसामान्यांच्या शाळेतील मुलांमुलींच्या शिक्षणांसाठी खर्च करण्याचे आवाहन प्रसिध्दी प्रमुख दिलीप शिरढोणे यांनी केले आहे.