ऊसतोड मजुरांसाठी राज्य सरकारच्या अनेक योजना कार्यरत – पठाण

Spread the love
पु.शिरोली / कुबेर हंकारे
ऊसतोड कामगारांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ योजनेचा लाभ घ्यावा.संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाकडून ऊसतोड मजूर असल्याचा दाखला आवश्यक आहे.या योजनेतून व्यक्तिगत अपघात विमा योजना, पाल्यांचे शैक्षणिक खर्च,पाल्यांच्या निवासाची व्यवस्था यासह अन्य लाभ मिळू शकतात असे मत हातकणंगले तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एल एम पठाण यांनी व्यक्त केले.ते शिरोली इथं आयोजित ऊसतोड मजूर कायदा शिबिरात बोलत होते.हातकणंगले तालुका विधी सेवा प्राधिकरण,पेठ वडगाव न्यायालय,शिरोली ग्रामपंचायत, शिरोली मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड मजुरांच्यासाठी आरोग्य शिबिर आणि ऊसतोड मजुरांच्या असणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी आज विधी सेवा प्राधिकरणाने शिबिराचे आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना हातकणंगले तालुका विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा पेटवडगाव न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश एल एम पठाण म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या ऊसतोड मजुरांच्या साठी अनेक योजना कार्यरत आहेत.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत ऊसतोड कामगारांची विमा,आरोग्य त्यांच्या पाल्यासाठी शैक्षणिक सुविधा यासह अन्य योजनेचा लाभ देण्यात येतो.तालुकास्तरावर अथवा ग्रामपंचायत मधून ऊसतोड मजूर असल्याचा दाखला मिळवल्यानंतर यासह अन्य योजनांचा लाभ मिळवता येतो.मुलांचे शिक्षण खंडित न होता ते अखंडित रहावे यासाठी त्यांच्यासाठी वस्तीगृहाची योजना सुद्धा कार्यान्वित आहे.  त्याचबरोबर नागरिकांनी लोक अदालतीच्या माध्यमातून प्रलंबित असणारे दावे आपापसात मिटवून घेतल्यास पैसा वेळ यांची बचत होते.  आणि निर्माण झालेली कटुता कमी होऊ शकते.
यावेळी एडवोकेट एम बी पाटील,माजी उपसरपंच कृष्णात करपे,तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
 दरम्यान शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ऊसतोड मजुरांचे रक्त तपासणी, शुगर तपासणी,सीबीसी, हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.शिरोली मेडिकल असोसिएशनच्या वतीने टॉनिक,खोकला, जंतनाशक गोळ्यांच्यासह ऊसतोड मजुरांच्या मुलांना खाऊचे वाटप न्यायाधीश एम एल पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम,विठ्ठल पाटील,विजय जाधव,प्रकाश कौंदाडे,निवास पाटील, योगेश खवरे बाळासाहेब पाटील,संपत संकपाळ राजू चौगुले,बालाजी नळे,डॉक्टर प्राजक्ता माने, अभिजीत शिंदे,प्रीती कांबळे यांच्यासह ऊसतोड मजूर,ग्रामस्थ उपस्थित होते.
error: Content is protected !!