ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

Spread the love
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांच्या  दर्शनासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी
पु.शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील श्री स्वामी समर्थ नाम जप भक्त मंडळ यांच्यावतीने दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सोमवारी २६ फेबुरवारी रोजी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ पादुकांचे दर्शन व नामस्मरण सोहळा बिरदेव मंदिर येथे श्री स्वामी समर्थ भाविकांच्या उच्चांकी गर्दीने संपन्न झाला.हा नामस्मरण सोहळा सायंकाळी ६:००ते रात्री ८.३० या वेळेत शिरोली येथील श्री बिरदेव मंदिर येथे संपन्न झाल.यामध्ये पादुका पूजन,प्रवचन,भजन,  नामस्मरण,महाआरती आणि नामस्मरण सोहळा प्रसिद्ध प्रवचनकार प्रा.कुलदीप साळोखे यांचे नामस्मरण व स्वामींची पदयात्रा या विषयावर प्रवचन झाले.त्यानंतर श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ कारभारवाडी यांचे भजन होऊन यामध्ये सामुदायिक पाच माळी जप करण्यात आला.
श्री स्वामी समर्थ या मंत्राने सर्व भाविक मंत्रमुग्ध होऊन गेले होते.त्यानंतर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी हा षडाक्षरी मंत्र सत्संग स्वरुपात घेण्यात आला.हा सोहळा मार्गशिर्ष व दत्त जयंतीनिमित्त आयोजित कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.तसेच रात्री ८.३० वाजता महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.नामस्मरण सोहळा संयोजन समितीने बैठक व्यवस्था व प्रसादाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे केली होती.अशा या ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या भव्य-दिव्य अध्यात्मिक नामस्मरण जप  महासोहळ्याचा पुलाची शिरोलीसह हातकणंगले पन्हाळा,करवीर व कोल्हापूर शहरातील हजारो स्वामी भक्तानी लाभ घेतला.
error: Content is protected !!