विश्वकर्मा वंशीय समाज संस्थेच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी विनायक सुतार

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

विश्वकर्मा वंशीय समाज संस्थेच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी विनायक महादेव सुतार तर जिल्हा सल्लागार समिती मध्ये सुहास रामचंद्र सुतार यांची निवड करण्यात आली. कोल्हापूर चे जिल्हाध्यक्ष संतोष पांचाळ यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्त हि निवड जाहीर करण्यात आली आहे.विश्वकर्मा वंशीय समाज संस्थेच्या माध्यमातून समाजातील वंचितांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देणे हा उद्देश असल्याचे नूतन तालुकाध्यक्ष विनायक सुतार यांनी सांगितले.या निवडीनंतर महावीर पाटील,अजित पाटील, ओम सातपुते,दिपक परीट यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सुनिल सुतार,श्रीधर सुतार,अमर सुतार,कुमार सुतार,राजू सुतार,संजय सुतार, चंद्रकांत सुतार,प्रकाश सुतार,पोपट सुतार यांच्यासह विश्वकर्मा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान विश्वकर्मा जयंती हि मोठ्या उत्साहात संपन्न झाली. भविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!