बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हरपला; महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान,मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यानं हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे मनोहर जोशी सक्रीय राजकारणापासून दूर होते.