वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केला शिवगर्जनेचा जागर
शिरोळ / प्रतिनिधी
येथील समर्थ क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात शिवजयंतीचे औचित्य साधत शिवचरित्राच्या आधारित पोवाडे गीत आणि नृत्य सादर करून शिवगर्जनेचा जागर केला.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवात करण्यात आली.रावसाहेब देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा आढावा आपल्या मनोगतांमध्ये घेतला समर्थ क्लासेसच्या संचालिका सौ अरुणा पाटील यांनी स्वागत केले.यानंतर स्नेहसंमेलनात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित पोवाडे नृत्य व गीत सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. सौ.स्वाती जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.सौ.अनुराधा माने सौ रुपा पाटील यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.चिमासाहेब पाटील यांनी आभार मानले.