जय भवानी महिला मंडळ आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

जय भवानी महिला मंडळ आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरोळ / प्रतिनिधी

येथील माळभाग परिसरातील जय भवानी महिला मंडळाच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधत महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला होता यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

जय भवानी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ शुभांगी फल्ले सदस्या मेघा लोंढे प्रियंका लोंढे सुनीता सुतार माया गायकवाड यांच्या पुढाकारातून परिसरातील महिलांसाठी होम मिनिस्टर हा समारंभ पार पाडला.यामध्ये संगीत खुर्ची वन मिनिट गेम शो यासह विविध स्पर्धा संपन्न झाल्या.संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम माधुरी गायकवाड, द्वितीय सारिका गंगधर,तृतीय ज्योत्स्ना पाटील,वन मिनिट गेम मध्ये अर्चना पाटील, सोनम पाटील,ज्योत्स्ना पाटील, नंदिनी हंकारे,भारती माने यांनी विजय मिळवला. आयोजित सर्व स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

 

यावेळी पार्वती लोंढे, शशिकला लोंढे, मंगल मुडशिंगे, ज्योती चावरे,सुवर्णा शेट्टी,सुनंदा साळुंखे,फुलाताई लोंढे, विमल सुतार,सोनाबाई सुतार,सुमन गंगधर, मंगल गंगधर, उज्वला गायकवाड, रुक्मिणी पाटील, सोनम पाटील, रूपाली जाधव,प्रीती जाधव, वंदना गंगधर, सारिका गंगधर, भारती माने यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!