बसवान खिंड येथे हॉटेल ट्रँगलसमोर अपघातात एक ठार

Spread the love

कोल्हापूर सांगली मार्गावरील बसवान खिंड येथे हॉटेल ट्रँगल समोर मंगळवारी सकाळी आयशरने पादचांऱ्यास उडवल्याने पादचारी जागीच ठार

झाला आहे.महादेव गायकवाड वय 30 रा विकासनगर इचलकरंजी मृत व्यक्तीचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर येथुन सांगलीकडे जाणारा आयशरने मंगळवारी सकाळी बसवान खिंड येथील हॉटेल ट्रँगल समोरून चालत जाणाऱ्या महादेव गायकवाड यांना मागून जोराची धडक दिली.यामध्ये गायकवाड हा जागीच ठार झाला.दरम्यान अपघातानंतर आयशर चालक पळून गेल्याने स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून तमदलगे येथे पकडले,यावेळी चालक मधधुंद अवस्थेत असल्याचे कळले,घटनास्थळी समर्थ रूग्णवाहिका व हातकणंगले पोलीस दाखल झाले असून सदर घटनेचा पंचनामा सुरू आहे.

error: Content is protected !!