शिवरायांचे आदर्श विचार अनुसरणे हीच काळाची गरज – दिलीप शिरढोणे
दत्तवाड:आज संकुचित जाती धर्माच्या विळख्यात सापडलेल्या व दिशाहिन समाजाला दृष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी शिवरायांचे आदर्श विचार अनुसरणे हीच काळाची गरज आहे.असे प्रतिपादन बांबरवाडी दत्तवाड शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे यांनी व्यक्त केले. विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड शाळेत आयोजित शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते.शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नामदेव चव्हाण यांचे शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.अध्यापिका सरिता राजमाने यांनी व ईश्वरी चव्हाण,जान्हवी पाटील,सुप्रिया कुरुंदवाडे, पृथ्वीराज चव्हाण,श्री चव्हाण,राजवीर पाटील, तीर्थराज भोसले या शालेय विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनकार्य आपल्या मनोगतातून विशद केले. याप्रसंगी शिवाजी चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते.