पंचगंगा पुलाजवळ अपघात : एकाचा जागीच मृत्यू

Spread the love
पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
 
पुणे-बेंगलोर महामार्गावर पंचगंगा नदीच्या पुलाजवळ ऊसाने भरलेल्या क्र.(केए 23 टीडी 8891 ) या ट्रॅक्टरला पाठीमागून दिल्याने संदीप राजाराम शिंदे (वय 41, सध्या रा. शिरोली मुळगाव चिकुर्डे, ता. वाळवा, जि. सांगली) हा जागीच ठार झाला.संदीप शिंदे हा आपली अक्टिव्हा क्र. (एमएच 09 ईडी 0841) हा भरधाव वेगात जात होता. यावेळी त्याच्या समोर असणाऱ्या ट्रॅक्टरला त्याने पाठिमागून जोरात धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. यावेळी गांधीनगर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास शिरोली पोलीस करीत आहेत.
error: Content is protected !!