शिरोळात ५ वी शिष्यवृत्ती २४१८ तर ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा ११६६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेतली जाणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता -५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा( इयत्ता -८वी) २०२४ ही परीक्षा आज संपन्न झाली.

 

इयत्ता ५वीची परीक्षा तालुक्यातील ९ केंद्रावर २४१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यासाठी १३० पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती तर इयत्ता ८वीची परीक्षा ५ केंद्रांवर ११६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यासाठी ७४ पर्यवेक्षकांनी काम पाहिले.

 

सदर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी वर्षभर अभ्यास करून आपली व आपल्या शाळेची गुणवत्ता सिध्द करण्यासाठी प्रयत्न करीत असतात तर मार्गदर्शक शिक्षक व पालकांची धडपड सुरु असते.गुणवताधारक विद्यार्थ्यांना राज्य शासनाची शिष्यवृती प्राप्त होते.तर काही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेची शिष्यवृत्ती मिळते.

 

 

विद्यार्थी दशेतील सर्वांत महत्वाची व स्पर्धा परीक्षेची सुरुवात शिष्यवृत्ती परीक्षेतून होत असते. म्हणून या परीक्षेला महत्त्व प्राप्त झाले आहे.विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी शिरोळ पंचायत समिती शिक्षण विभागाने रोटरी हेरिटेज शिरोळ यांच्या सहकार्याने सराव परीक्षेचेआयोजन केले होते.

 

 

तर अश्वमेघ सोशल फौंडेशनने संपूर्ण कोल्हापूर जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरुप व आपली झालेली तयारी विद्यार्थ्यांना अवगत झाली. त्यादृष्टीने परीक्षेस आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास मदत झाली.

 

शिरोळच्या गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभागप्रमुख अनिल ओमासे, शिक्षण विस्तार अधिकारी नारायण पाटील, दिपक कामत,केंद्र प्रमुख अण्णा मुंडे,दत्तात्रय जाधवर,

 

रियाज अहमद पटेल, यशवंत पेठे,परीक्षा विभाग टीम मधील सुरेश पाणदारे,राजेंद्र नाईक,रमेश शंकर कोळी, अजित मजलेकर,सुभाष कुरुंदवाडे, सलीम अत्तार यांच्या सहकार्याने सुरळीत पार पडली.

error: Content is protected !!