राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शिवम माळकर प्रथम

Spread the love

इस्लामपूर / प्रतिनिधी

श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर यांच्या वतीने आमदार जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शिवम संजय माळकर याने प्रथम क्रमांक पटकावला.तो सांगली येथील भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजचा विद्यार्थी आहे.त्याला रोख रू.५००१, स्मृतीचषक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या स्पर्धेत महाराष्ट्रातील सांगली,कोल्हापूर,सातारा,पुणे, अहमदनगर अशा राज्यातील विविध ठिकाणच्या ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.पारितोषिक वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेलीच्या अध्यक्षा ॲड.विद्या विजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास काळे,स्पर्धा समन्वयक डॉ.विकास पाटील,प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.या स्पर्धेसाठी शिवम याला भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजच्या संचालिका डॉ.पल्लवी जामसांडेकर व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल शिवम सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!