प.पू.आचार्य १०८ विद्यासागर महाराज यांचे निर्वाण

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी

प.पू. आचार्य १०८ विद्यासागर महाराज यांचे रविवारी पहाटे निर्वाण झाले. जैन धर्मातील सर्वात प्रभावशाली धर्मसुधारक म्हणून संपुर्ण जगभरात त्यांची ओळख आहे.दिगंबर जैन मुनि परंपरा हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. ही मुनि परंपरा पुन्हा एकदा पूर्णस्थापित करण्याचे कार्य परमपूज्य प्रथमचार्य 108 श्री शांतिसागरजी महाराज यांनी केले.अलीकडच्या काळामध्ये अनेक त्यागींची ही परंपरा सुरू असताना, याच मालिकेमध्ये एक अत्यंत कठोर तपश्चरण करणारे, जिनवाणीचा अत्यंत सखोल अभ्यास असणारे, शेकडो श्रावकांना दिगंबर मुनि दीक्षा देऊन त्यांच्या जीवनाचे अनमोल परिवर्तन करणाऱ्या, त्याचप्रमाणे लाखो श्रावक – श्राविकांना सतत आपल्या अनमोल हितोपदेशाच्या माध्यमातून त्यांना धर्म मार्गावर पुन्हा एकदा प्रस्थापित करणाऱ्या, अत्यंत ज्ञानी, घोर तपस्वी, संतश्रेष्ठ प.पू.108 आ श्री विद्यासागर जी महाराज यांच्या भव्यात्म्याला भावपूर्ण विनयांजली.असे श्रेष्ठ संत, गुरूवर्य पुन्हा होणे नाही.

error: Content is protected !!