पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथे सांगली बायपास रोडच्या मागे पुणे ते कोल्हापुर जाणारे हायवे रोडवर अज्ञात वाहन चालकाने जोराची धडक एक ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे याबाबतची फिर्याद शुभम शिवाजी शेळके वय २१ व्यवसाय शिक्षण मरगाई गल्ली वळीवडे ता करवीर याने शिरोली MIDC पोलीस ठाण्यात दिली आहे.याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की पुणे ते कोल्हापुर जाणारे हायवे रोडवर अज्ञात वाहन चालकाने जोराची धडक देऊन एक 40 वर्षीय अज्ञात इसमाचा मृत्यू झाला आहे मात्र,या अपघाताची वर्दी न देता पळून गेलेने अज्ञात चालका विरुद्ध शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास भारूपोनि श्री गिरी साधे याचे समक्ष आदेशाने पोहेकॉ पाटील हे करीत आहेत.