कॅनान लिगल लॉ फर्म अन्यायग्रस्त कोळी जमातीला मार्गदर्शन व सहाय्य करणार – डॉ.मनोहर कोळी

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी

 

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ,मराठवाडा,खानदेश या भागातील आदिवासी क्षेत्राबाहेरील सर्वसामान्य जनतेवर होत असलेला अन्याय,दुजाभाव दूर करुन कायदेशीररीत्या न्याय मिळवून देण्यासाठी कॅनन लिगल फर्मची कोल्हापुरात सुरुवात केली आहे.योग्य त्या कायदेशीर मार्गाने जमातीचे दाखले मिळवून देणे, जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न करणे,अनुसूचित कर्मचाऱ्यांच्यावर अधिसंख्य पदावर वर्ग करणे,सेवानिवृत कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यास होत असलेला विलंब अशा सर्व प्रकारच्या अन्यायाला कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी कॅनन लिगल फर्मची सुरुवात कसबा बावडा कोल्हापूर येथील रमण मळा परिसरात सदर फर्म सुरु करण्यात आली आहे.
कोळी जमातीचे अभ्यासक डॉ.मनोहर कोळी व औरंगाबाद येथील मुंबई उच्च न्यायालयाचे ख्यातनाम वकिल अॅड.मोहनिश थोरात यांच्या सहकार्याने सदर फर्म सुरु करण्यात आला आहे.याचा लाभ जमात बांधवांनी घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी रमेश शंकर कोळी,भगवान कोळी,मारुती कोळी,नारायण कोळी,अंगद भोजे,श्रीधर कोळी,लक्ष्मण तराळ,डी.ए.कोळी,हंबीरराव संकपाळ,मारूती कोळी (चुयेकर),दिलीप शिरढोणे उपस्थित होते.

error: Content is protected !!