टाकळीहून दानवाडच्या मार्गाने जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाच्या धडकेत सायकल स्वार गंभीर जखमी
झाल्याची घटना शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.या धडकेनंतर आयशर टेम्पो लगत असलेल्या शेतात जाऊन उलटल्याने मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान या अपघातानंतर आयशर चालक मुस्तकिम आयुब बागवान राहणार लक्ष्मीनगर मजरेवाडी हा कुरुंदवाड पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. कुरुंदवाडहून संकेश्वरकडे पालेभाज्याने भरून आयशर टेम्पो जात असताना टाकळी दानवाड मार्गावरुन सायकल वरून जाणाऱ्या दादा कल्लाप्पा गुरव वय वर्षे ६८ यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. या धडकी नंतर आयशर चालकाचा ताबा सुटल्याने आयशर लगत असणाऱ्या शेतात जाऊन उलटली.या अपघातानंतर जखमी गुरव यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आहे.