कुरुंदवाड / प्रतिनिधी
शिवजयंती शांततेत साजरी करण्यासाठी जयंती उत्सवा दरम्यान शांतता कमिटीच्या सर्व सदस्यांनी तसेच जेष्ठ नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा.तसेच यंदा शांतता समितीचे योगदान मोलाचे आहे.जेणेकरून पोलीस प्रशासनाला मोठी मदत होईल असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरिक्षक रविराज फडणीस यांनी केले.
येथील पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी शिवजयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते.उपनिरीक्षक सागर पवार,गोपनीय शाखेचे फारूक जमादार, कार्यक्षेत्रातील सर्व गावातील पोलीस पाटील,तंटामुक्त अध्यक्ष,विविध मंडळाचे पदाधिकारी व साऊंड सिस्टमचे मालक आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना सपोनि फडणीस म्हणाले की कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन माझ्यापुढे आहे. यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. शिवरायांची जयंती ही सामजिक भान ठेऊन साजरी करावी. एकमेकांना सहकार्य करावे समाजात देण्याची वृत्ती कमी झाली आहे. काही गोष्टी विकसीत झाल्या पाहिजे लोकाभिमुख कार्य करा.
कायदा सर्वांच्या सोईसाठी असतो. नागरिकांनी सहकार्य करावे. या दरम्यान शांतता समिती सदस्य याचे स्थान महत्वाचे सर्वांनी हजर रहावे जेणेकरून मदत होईल. यावेळी शांततेत शिवजयंती साजरी करावी असे सांगितले.यावेळी पोलीस प्रशासनातर्फे मिरवणूक वाद्य साऊंड सिस्टिम आणि इतर बाबींची सूचना करण्यात आली.त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी ही मिरवणूक चांगल्या पद्धतीने साजरी होण्याच्या दृष्टीने सूचना मांडल्या.