बुधवार दिनांक 14 रोजी रात्रीच्या सुमारास अण्णाप्पा गुंडा धनगर, राजेंद्र सुभाष धनगर, भरमा महादेव धनगर ,शिवाजी बिरू गूपचे सर्व राहणार शिरोळ यांच्या मेंढ्या अमरसिंह जयसिंग जगदाळे गट नंबर 787 नांदणी रोड शिरोळ,तालुका शिरोळ याच्या रानात खतासाठी बसविण्यात आले होत्या.
रात्री अज्ञात चोरट्याने यांच्या मेंढ्याच्या कळपातून सुमारे सतरा मेंढ्या चोरून नेल्याची माहीती गुरुवारी सकाळी 6 वाजता मेंढपाळांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ शिरोळ पोलीस स्टेशनची संपर्क साधला.शिरोळ पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी रीतसर फिर्याद नोंद करून,पंचनामा केला.व मेंढ्यांचे चोर शोधण्याची मोहीम सुरू केली.
दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी फोनवरून स्वतः शिरोळ पोलीस स्टेशनच्या अधिकारी मेंढ्या बाबत चोरी प्रकरणाचा छडा लावण्याची सूचना केली.तसेच स्वतः आमदार गोपीचंद पडळकर हे वाढत्या मेंढ्यांच्या चोरी प्रकरणी वरिष्ठ पातळीवर गृह विभागाशी व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर कायमस्वरूपी चाफ बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी हिंदुस्तान शिव मल्हार सेनेचे कार्यकर्ते अमर पुजारी म्हणाले शिरोळ तालुक्यामध्ये मेंढ्या चोरीचे प्रमाण वाढ झाल्याने पोलीस प्रशासनाने ताबडतोब चोरांना पकडून मेंढपाळांना न्याय द्यावा अन्यथा हिंदुस्तान शिव मल्हार सेनेच्या वतीने यावर मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.