औरवाड येथील कुमार विद्या मंदिर (मराठी) या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठया उत्साहात संपन्न झाले. ग्रामस्थ व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चिमुकल्यांच्या विविध प्रकारच्या नृत्याविष्काराने प्रेक्षक भारावून गेले.अनेकांनी बक्षिसांचा वर्षाव करीत कौतुक केले. स्नेहसंमेलनाच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत औरवाड यांनी ५००० रुपयांची देणगी दिली.ग्रामपंचायत सदस्य यासीन बहाद्दूर व बॅ.बाळासाहेब खर्डेकर शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्थेचे संचालक नियाज सरवर पटेल यांनी प्रत्येकी २ अनाथ मुलीं दत्तक घेतल्या. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.स्नेहसंमेलनासाठी मुख्याध्यापक लक्ष्मण गायकवाड,सुनिता पवार,संतोष ढाकणे,सीमा मंगसुळे,सानिका मंगसुळे,समीर कांबळे यांनी परिश्रम घेतले.नृत्यदिग्दर्शन पवार यांनी केले.याप्रसंगी सरपंच शफी पटेल,उपसरपंच विशाल दुग्गे,सर्व सदस्य, बाळासाहेब माने सोसायटी चेअरमन राजू रावण,पालक उपस्थित होते.