गोकुळचे माजी चेअरमन स्व.दिलीपराव पाटील यांची ७१ वी जयंती

Spread the love

गोकुळचे माजी चेअरमन स्व दिलीपराव पाटील यांची शिरोळमध्ये रविवारी जयंती

शिरोळ / प्रतिनिधी

माजी सरपंच,गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व शिरोळ नगरपरिषद संकल्पनेचे जनक स्वर्गीय दिलीपराव माने – पाटील (दादा) यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.रविवार (दि १८) सकाळी ९ वाजता श्री दत्त साखर कारखाना मेन गेट समोरील माने -पाटील निवासस्थानी हा कार्यक्रम होणार असून सदर कार्यक्रमास दादाप्रेमी कार्यकर्त्यांसह सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास गावडे यांनी केले आहे.

 

स्वर्गीय दिलीपराव माने -पाटील दादा यांनी बहुजन समाजाचे नेतृत्व करून सर्वसामान्य ,गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी तसेच त्यांना सर्वतोपरी सहकार्य करून लोकाभिमुख कार्य केले आहे.शिरोळ ग्रामपंचायत,गोकुळ दूध संघ व विविध संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी,शेतमजूर नागरिक यांच्या हितासाठी आयुष्य खर्ची घातले आहे.

 

 

त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने होत असलेल्या अभिवादन कार्यक्रमास सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक,शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून दादा प्रेमी कार्यकर्तेसह सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री गावडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!