१६० जणांच्यावर कुरुंदवाड पोलिसांकडून कारवाईचा दणका

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

कुरुंदवाड पोलीस ठाण्यातर्फे जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे मद्यपान करून वाहन चालवणे,मद्यपान करून चोरीच्या इराद्याने संशयितरित्या फिरणे अशा 160 हुन अधिक जणांच्यावर कारवाई करत 52 जणांच्यावर खटले भरण्यात आले,तर दीड लाखापेक्षा अधिक दंड वसूल करत कारवाईचा पोलिसांनी कारवाईचा दणका दिला आहे.त्यामुळे मद्यपिंचे धाबे दणाणले आहेत
दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,उपअधीक्षक समीरसिंह साळवे,सपोनि रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नागेश केरीफळे, सागर खाडे, ज्ञानदेव सानप,विवेक कराडेसह आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

कुरुंदवाड पोलीस प्रशासनातर्फे जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत रात्री 11 वाजण्याच्या पुढे मद्यपान करून चोरीचा कट रचून संशयितरित्या फिरणाऱ्या पाच जणांवर खटले भरण्यात आले.त्यापैकी एकाकडून चोरीची दुचाकी स्प्लेडर मिळून आली चोरीचा गुन्हा उघडकीस आला.पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राजापूर बंधारा,शिरढोण पूल,सलगर सदलगा महामार्गावर तेरवाड परिसरात,कृष्णाघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिंचेच्या झाडाखाली तर कार्यक्रमाच्या ठिकाणी अडगळीला,आणि पोलीस खबऱ्यांच्या माहितीनुसार मिळून आलेल्या पत्त्यावर छापा टाकून आजपर्यंत 120 जणांच्यावर कारवाई करत दंड वसूल केला.

 

उसाचा हंगाम सुरू असल्याने मद्यपान करून ट्रॅक्टर चालवणे दुचाकी चालवणे चार चाकी वाहन चालवणे तसेच नववर्षाच्या स्वागतादरम्यान मद्यपान करून दुचाकीवरून रस्त्यावरून धिंगाणा घालत जात असताना पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान मिळून आलेल्या अशा 25 जणांच्यावर कारवाई करून दंड वसूल केला.

 

दोन महिन्यात झालेल्या कारवाईतुन मोठी दंडात्मक करवाई करण्याचा पोलीस प्रशासनने धडाका लावत मद्यपान करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे.

 

महत्वाचे 

मद्यपिंच्या चुकीला माफी नाही.मद्यपान करून वाहन चालवणे हा एक गुन्हा आहे.यामुळे अपघात घडू शकतात आपल्या कुटुंबाबरोबरच अपघातामुळे एखाद्याची जीवित हानी झाली तर त्याच्या कुटुंबाचेही मोठे नुकसान आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे म्हणजेच समाजामध्ये व्यसनाबाबत प्रसार करण्यासारखा गुन्हा आहे. या सर्व गोष्टीला आळा घालण्यासाठी यापुढे मध्यप्रदेशच्या चुकीला माफी देणार नसून त्यांच्यावर खटले भरण्यात येणार असल्याचा इशारा स.पो.नी रविराज फडणीस यांनी दिला आहे.

error: Content is protected !!