स्व.दिनकररावजी यादव दूध संस्थेच्या तिसऱ्या शाखेचा दत्तनगर येथे शुभारंभ

Spread the love

स्व दिनकररावजी यादव दूध संस्थेच्या तिसऱ्या शाखेचा दत्तनगर येथे शुभारंभ

शिरोळ / प्रतिनिधी

येथील दिनबंधू स्व दिनकररावजी यादव दूध व्यवसायिक सहकारी संस्थेच्या तिसऱ्या शाखेचा शुभारंभ दत्तनगर येथे संस्थेचे संस्थापक आणि दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

 

दत्तनगर येथील मांजरे तळ येथे परिसरातील दूध उत्पादकांच्या सोयीकरिता दिनबंधू स्व दिनकररावजी यादव दूध व्यवसायिक सहकारी संस्थेच्या तिसऱ्या शाखेची स्थापना करण्यात आली.स्थानिक दूध उत्पादकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून दूध संस्थेचा शुभारंभ करण्यात आला.

 

अनिलराव यादव यांनी दूध उत्पादक व सभासदांच्या हितासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातील अशी ग्वाही दिली.दूध संस्थेचे चेअरमन विराजसिंह यादव यांनी स्वागत व प्रस्ताविक करताना यादव दूध संस्थेच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासून संस्थेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहून असे आश्वासन दिले.

 

 

 

दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पवार संचालक बाळासाहेब चव्हाण दत्तात्रय काळे सुनील कोळी प्रल्हाद पाटील देवाप्पा पुजारी यादव सोसायटीचे चेअरमन दगडू चव्हाण संचालक मन्सूर शेख आयजाक भोरे संजय चव्हाण मारुती मांजरे, अमर रजपूत,राजाराम माने ,कैलास रजपूत,विष्णू शिंदे,किरण पाटील,अक्षय भाट,लखन कोळी,राहुल लोहार, तौफीक शेख प्रफुल कोळी इस्माईल चौगुले संदीप माने सुनील शिंदे शिवाजी पवार पिंटू चुडमुंगे यांच्यासह सभासद व दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!