गोठ्याचा कडीकोयंडा काढून गाभण गाईची चोरी

Spread the love

हेरवाड ता.शिरोळ येथून रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचा कडीकोयंडा काढून सुमारे 90 हजार रुपये किंमतीची गाभण गाय चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,हेरवाड येथील काडसिद्धेश्वर मंदिर (सरकार मळा) येथे दिनकर माळी यांची शेती तसेच जनावरांचा गोठा आहे.रविवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हराळे मळा रोडच्या बाजूला गाडी लावून गोठ्याचा कडी कोंयंडा काढून 90 हजार रुपये किंमतीची दोन महिन्याची गाभण असलेली गाय चोरून नेली आहे.दरम्यान, सदरची गाय ही कर्नाटक राज्यात चोरट्यांनी नेली असल्याची चर्चा सुरू आहे.

error: Content is protected !!