“मन सुन्न करणारी घटना” हल्लेखोरांचा असा लागला शोध

Spread the love

इचलकरंजी शहरामध्ये कत्तल खाण्याजवळ असणाऱ्या कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये परशुराम कुराडे याची डोक्यात दगड घालून निघून हत्या करण्यात आली होती.  पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत आरोपींना 24 तासाच्या आत गजाआड केले आहे.यामधील रेकॉर्डवरील दोघांवर गुन्हा दाखल आहे.यामध्ये अजय काशीद व आदम मुजावर व या दोघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले  आहे.तर खुनातील साहिल चव्हाण हा आरोपी फरार आहे अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत.

इचलकरंजी शहरामध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास कत्तलखान्या जवळील असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये परशुराम व आदम व अजय व  साहिल हे चौघेजन कोल्हाटी समाजाच्या  स्मशानभूमीमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी या चौघांमध्ये वाद झाला होता.यावेळी वाद इतका टोकाला गेला की यातील परशुराम कुराडे याच्या डोक्यामध्ये पहिला सिमेंटच्या   दगडाने मारहाण केली.त्यावेळी परशुराम जागीच कोसळला यामध्ये परशुरामने झटापट केली.पण तेथे असणाऱ्या आदम,अजय व साहिल चव्हाण यांनी तेथे असणारा एक मोठा दगड घेऊन परशुरामच्या डोक्यात घातला. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत तो तडफडत होता.त्याचा मृत्यू झाला नाही म्हणून आणि येथील अन्य दोन दगड परशुरामच्या डोक्यात अजय व आदमने व साहिल याने घातले.त्यानंतर या तिघांनी तेथून पलायन केले व तेथेच असणाऱ्या एक दारू अड्ड्यावर जाऊन दारू मागितली.त्यावेळी आदमच्या हाताला रक्त लागले होते व तेथेच त्यांनी सांगितले की उद्या माझी मोठी बातमी येणार

आहे.याच तपासावरून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अजय काशीद आदम मुजावर या दोघांना पोलिसांनी 24 तासाच्या आत गजाआड केले.तर साहिल चव्हाण हा  फरार आहे.काही वर्षांपूर्वी यांनी एका युवकाची दारूच्या नशेमध्ये डोक्यात दगड घालून खून  केला होता.पुन्हा त्यांनी हेच कृत्य केले आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा व गावभाग पोलिसांनी संयुक्त ही कामगिरी केली आहे.या तपासात पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, संदीप जाधव,राजू शिंदे, खंडेराव कोळी,सचिन देसाई,तुकाराम राजगिरे, महेश खोत,संजय इंगोले,आयुब गडकरी,अमर शिरढोणे,नवनाथ कदम,सुशील पाटील यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणत आरोपींना गजाआड केले आहे.

error: Content is protected !!