‘अजब सल्ला’ आमदार संतोष बांगर यांचा “तो” व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Spread the love

‘आई-वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवू नका’,असे अजब विधान शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे.शिंदे गटाचे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांचा चिमुकल्यांना हा अजब सल्ला दिल्याने संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेंत आले आहेत.संतोष बांगर असेही म्हणाले की, त्यांनी विचारलं का जेवत नाही तर त्यांना म्हणायचं आमदार संतोष बांगर यांना मतदान करा तेव्हा जेवतो नाहीतर जेवत नाही… कळमनुरी विधानसभेतील एक शाळेत विद्यार्थ्यांना आमदार संतोष बांगर यांनी हा अजब सल्ला देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

error: Content is protected !!