‘स्वाभिमानी’ आक्रमक,टाळे ठोकण्याचा दिला इशारा

Spread the love

तेरवाड बंधारा गेली अनेक वर्षे अखेरची घटका मोजत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून वारंवार मागणी करून देखील देखभाल दुरुस्ती होत नसल्याच्या कारणातून शुक्रवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कुरुंदवाड येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर सकाळी दहा वाजता एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली.यावेळी पाटबंधारे विभागाच्या वतीने संबंधित ठेकेदारांनी बाहेर रक्कम जप्त करून त्या ठेकेदारास ब्लॅक लिस्टला टाकून नव्याने टेंडर प्रोसेस प्रसिद्ध केले जाईल व लवकरच बंदऱ्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्याचे आश्वासन दिल्याने आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी स्वाभिमानी युवा आघाडीचे शिरोळ तालुका अध्यक्ष बंडू पाटील,सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांच्यासह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!