निखिल वागळे यांची गाडी फोडली,पुण्यात येण्यास विरोध

Spread the love

निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून व्यवस्थेला सडेतोड सवाल करणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यातील डेक्कन भागातील खंडोजी बाबा खोपडे चौकात भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला.निखिल वागळे यांची गाडी पोलीस सुरक्षेत दांडेकर पुलानजीक असलेल्या राष्ट्र सेवा दल येथील नियोजित निर्भय बनो सभेसाठी जात होती.परंतु रस्त्यातच त्यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला.निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते,माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांनी पुण्यात येण्यास विरोध केला होता.तसेच या सभेस परवानगी न देण्याची मागणीही करण्यात आली होती.

error: Content is protected !!