शरद पवार सांगतील तोच आमचा पक्ष आणि तीच आमची दिशा : स्नेहा देसाई

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

शरद पवार हेच आमचे ब्रँड आहेत येणाऱ्या काळात शरद पवारांच्या विचारांचा वारसा शिरोळ तालुका जपणार आहे.आज घरातील लोक त्यांच्यापासून बाजूला गेले आणि राष्ट्रवादीत फूट पाडली.इतक्यावर न थांबता राष्ट्रवादी पक्षच स्वतःचा करून घेतला.मात्र,ज्या राष्ट्रवादीची स्थापना शरदचंद्रजी पवार यांनी केली अशा नेत्याच्या मागे महाराष्ट्रातील जनता नेहमी राहणार असल्याने येणाऱ्या काळात नक्कीच याचा हिशोब केला जाईल असा इशारा शरद पवार गटाच्या शिरोळ तालुका अध्यक्षा स्नेहा वसंतराव देसाई यांनी दिला.

 

कुरुंदवाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा तसेच अजित पवार यांचा शिरोळ तालुका महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी सुमन चव्हाण,अनिता देसाई,सुनिता देसाई, सुवर्णा देसाई,अरुणा देसाई,तेजस्विनी देसाई,वैशाली कोरुचे, सुमन चव्हाण,अनुराधा सातपुते,अनिता माळी, राधाबाई गायकवाड,शोभा नागराळे यांच्यासह तालुक्यातील महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!