मराठी शाळेची नूतन इमारत बेकायदेशीर जिल्हा परिषदेला वर्ग : रामगोंडा पाटील

Spread the love

मराठी शाळेची नूतन इमारती बेकायदेशीर जिल्हा परिषदेला वर्ग : रामगोंडा पाटील

खिद्रापूर / प्रतिनिधी

मराठी विद्यां मंदिर खिद्रापूर या शाळेच्या आरसीसी खोल्या बेकायदेशीर पणे वर्ग केले असून याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी खिद्रापूरचे रामगोंडा पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.यावेळी रामगोंडा पाटील म्हणाले, कोणतीही मासिक सभा, व गाव सभेत विषय न घेता मासिक मिटींग मध्ये आयत्या वेळच्या विषयामध्ये घेऊन ग्रामपंचायत सदस्यांना अंधारात ठेवून ग्रामपंचायतकडे असणारे मराठी शाळेची नवीन आरसीसी इमारत कोल्हापूर जिल्हा परिषदेकडेकडे वर्ग करण्याचा कुटिल कारस्थान ग्रामसेवक व काही सदस्यांनी मिळून संगनमताने केला आहे.याची सखोल चौकशी व्हावे सदर निर्णय ग्रामसभेत ठेवून पुढील निर्णय घ्यावे असे ही ते म्हणाले.

error: Content is protected !!