नैराश्येतून शिरोळ येथील युवकाची आत्महत्या

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळमधील राजाराम अनिल काळे वय ३६ वर्षे याने नैराश्यातून राहते घराच्या जिन्याच्या ग्रीलला गळफास लावून घेवून आत्महत्या केली.हि घटना मंगळवार दि ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली या बाबतची वर्दी विजय बाळासाहेब काळे यांनी शिरोळ पोलीसात दिली आहे.पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी राजाराम अनिल काळे याचे चार महिन्यापुर्वी त्याचे डावे हाताची पुढची तीन बोटे मशीनमध्ये सापडुन तुटली होती.या नैराश्यतेतुन गळफास लावून घेवुन आत्महत्या केली.याबाबत शिरोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत राजाराम काळे यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,भाऊ,भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजता शिरोळ येथे होणार आहे.

error: Content is protected !!