ब्रिलियंट स्कूल एक उपक्रमशील शाळा – मोहन माने

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट, संचलित ब्रिलीयंट इंग्लिश मिडीयम स्कूल शिरोळ मधील एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते असे मत संस्थेचे अध्यक्ष मोहन माने यांनी पालक मेळाव्यामध्ये व्यक्त केले.विदयार्थ्यांच्या सर्वागीन विकासाच्या दृष्टीने या शाळेचे विदयार्थी सक्षम बनावा यासाठी स्कूलमध्ये विविध उपक्रम राबविले जातात ज्यामध्ये विदयार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक शनिवारी महावाचन अभिनव उपक्रम राबविला जातो समाज्यामध्ये प्लॅस्टिक बंदीचे महत्व पटवून देणे तसेच स्वच्छता व पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळेचे विदयार्थी त्यांच्या गावामध्ये गल्लीमध्ये याबाबत जनजागृती करत असतात विदयार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेसे ज्ञान अकात व्हावे म्हणून स्कूलमध्ये बचत बँक सुरू करण्यात आली आहे.
विदयार्थ्यांच्या आरोग्य विषयी शाळेकडून वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते.वैदयकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टरांकडून विदयार्थ्यांची तपासणी करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनपर शिबीरे आयोजित केली जातात व्यवसायिक शिक्षणाचे धडे या शाळेतून बहुविविध कौशल्यावर आधारित शिक्षणही दिले जाते. म्हणून ही शाळा येथील उपक्रमशील स्कूल म्हणून ओळाखले जाते.असे मनोगत मोहन माने यांनी व्यक्त केले तसेच पालक आणि विचारलेली कामकाज विषयाची सर्व माहिती देण्यात आली.यावेळी सर्व पालकवर्ग, शाळेचे प्राचार्य व शिक्षक पालक समितीचे सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!