धनगर समाजाच्या उपोषणाला यशवंत ब्रिगेडचा पाठिंबा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

धनगर समाजास एस टी आरक्षण मिळावे यासाठी म्हसवड येथे धनगर समाजाचे सुरू असलेल्या उपोषणास यशवंत ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे.उपोषणस्थळी यशवंत ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.संतोष कोळेकर प्रदेशाध्यक्ष अमोल गावडे,प्रदेश सदस्य दादासो कोळेकर,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप हजारे,जिल्हा संपर्कप्रमुख अनिल बनकर,महिला कोल्हापूर जिल्हाध्यक्षा सौ.योगिता घुले, सौ.मेघा गावडे,धनगर आरक्षण अभ्यासक डॉ.ईश्वर यमगर,जयसिंग कोळेकर,आकाश शिसाळ आदींनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा देऊन धनगर समाजाचा आरक्षण मिळावे यासाठी तीव्र लढा उभा करण्याचे आश्वासन दिले.

error: Content is protected !!