विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्हा दौऱ्यावर नागरिकांनी प्रश्न घेऊन संपर्क साधावा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

 

शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी२०२४ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या दिवशी आपले सर्व प्रश्न लेखी स्वरूपात घेऊन संपर्क साधावा असे आवाहन शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी केले.विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथील माजी आमदार उल्हास पाटील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक झाली.या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे गुरुवारी सकाळी१० ते १ या वेळेत कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात जनता दरबार घेणार आहेत.तरी नागरिकांनी आपले शासकीय प्रलंबित प्रश्न लेखी स्वरूपात घेऊन विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यापुढे मांडावेत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.तरी नागरिकांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार उल्हास पाटील यांनी केले.
उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हाजिअस्लम सय्यद,राज्य संघटक चंगेजखान पठाण, शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव उगळे,महिला जिल्हा संघटिका मंगलताई चव्हाण,उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील,युवासेना उपजिल्हाधिकारी प्रतीक धनवडे,महिला उपजिल्हा संघटिका वैशालीताई जुगळे,तालुका संघटिका साजिदा घोरी,युवासेना तालुका प्रमुख निलेश तवंदकर,कुरुंदवाडशहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांच्यासह उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख शहर प्रमुख शिवसेना युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!