मेष – या राशीच्या मंडळीचे आज आरोग्य चांगले राहील.आजच्या दिवशी अनाठायी खर्च नको. आजचा दिवस लाभदायक ठरेल,विदेशातील लोकांशी व्यावसाय करण्यासाठी योग्य दिवस आहे.
वृषभ – या राशीच्या मंडळीचे आज आरोग्य चांगले राहील, आज तुम्हचे मनोधैर्य आणि चैतन्य वाढेल.आज आपल्या कामाची किंमत कळेल,आवडत्या काम करण्यात यशस्वी व्हाल.
मिथुन – या राशीच्या मंडळीना आज आर्थिक स्थिती चांगली राहिल,गरोदर स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी.कौटुंबिक जबाबदाऱ्या आल्याने मनावर दडपण येईल.
कर्क – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस चांगला जाईल,वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलहमुळे तणावामुळे लक्ष विचलित होईल. आज पैश्याची कमतरता भासेल,सायंकाळी अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने वातावरण आनंदी होईल
सिंह – या राशीच्या मंडळीना आर्थिक लाभ होईल,तुम्हच्याकडून जवळचे लोक कामाचा अपेक्षा करतील,कामाचा ताण घेऊ नका,आज लाभदायक दिवस आहे,प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्तीमुळे कौतुक होईल.
कन्या – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस अनुकूल असेल,कामातून आज कुटूंबाला वेळ द्याल,कामाच्या ठिकाणी वातावरणात आज सकारात्मक असेल,काही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल,
तूळ – या राशीच्या मंडळीना आज चांगला दिवस असेल,आज आनंद,मनोरंजन लाभेल,आज वादविवाद टाळा.कार्य-क्षेत्रात आधुनिकता आणा.नवीन टेकनॉलॉजिने अपडेटेड राहा.
वृश्चिक – या राशीच्या मंडळीना कुटूंबाचे सहकार्य लाभेल,आज थोडी सावधगिरी बाळगा,दुसऱ्यांच्या शब्दावर विसंबून राहू नका, मोठ्या कामाची संधी उपलब्ध होईल,मान सन्मान मिळेल
धनु – या राशीच्या मंडळीनी आरोग्याची काळजी घ्यावी,आज नातेसंबंध नव्याने दृढ होतील,आज व्यावसायिकांना चांगला दिवस.व्यवसायाच्या निमित्ताचा प्रवास फायद्याचा ठरेल.आज जोडीदारासोबत वेळ घालवाल आज तुम्ही भावूक व्हाल.
मकर – या राशीच्या मंडळीना आज गुंतवणूकीसाठी उत्तम दिवस,पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा.आज तुम्हच्यावर कौतुकाची थाप मिळेल,आज काही नवीन काम करण्याचा विचार कराल
कुंभ – या राशीच्या मंडळीना आज आर्थिक नुकसान होऊ शकते,आज संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो.वेळेचा सदुपयोग करू शकता. आज कोणतेही महत्वाचे काम करू नका
मीन – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस उत्तम असेल,आरोग्याची काळजी घ्या, कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल.व्यापारी मंडळीनी सावधगिरी बाळगा,गरजूंना सामाजिक भावनेतून मदत करा.