“ब्रेकिंग” युवकाचा धारधार हत्याराने वार करून निर्घृण खून

Spread the love

तारदाळ

/ प्रतिनिधी

खोतवाडी येथे आरोही बार जवळ तारदाळ येथील जावाईवाडी परिसरातील मयुर दिपक कांबळे ( वय २५ ) या युवकाचा तिघा युवकांनी धारधार शस्त्रानी सपा सप वार करून निर्घुण खुन केला.ही घटना शनिवारी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास घडली.तारदाळ येथीलच चार युवक एका बार मध्ये दारू पिण्यासाठी बसले होते.यावेळी पुर्वीच्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादाचा राग उफाळून आल्याने जोरदार वादावादी झाली. यावेळी मारेकऱ्यांनी तलवारी सारख्या धारदार शस्त्रांनी मयुरला गाठून हल्ला चढवला.तसेच मयुर खाली कोसळल्याने मारेकऱ्यांनी दगड घेवून डोक्याचा अक्षरशः चेदां मेंदा केला.त्यामुळे तो जागीच मृत झाला. या घटनेने तारदाळ खोतवाडी परिसरात खळबळ माजली आहे.

घटनास्थळावरील माहिती अशी

इचलकरंजी शहालगत असणाऱ्या खोतवाडी गावामध्ये मयूर दीपक कांबळे या युवकाचा धारदार शस्त्राने सुमारे २२ वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मयूर कांबळे हा तारदाळ येथील जावईवाडी मध्ये राहण्यास आहे.तो हमालीची काम करत होता.मयूर व त्याचा मित्र चव्हाण या दोघांमध्ये गेल्या काही दिवसापासून वादावादीचे प्रकार घडत होते.गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांमध्ये मोठा वादही झाला होता.तर शेजाऱ्यांनी व त्याच्या मित्रांनी हा वाद मिटवला होता.पण पुन्हा काल सकाळी वादाचे रूपांतर घडले पुन्हा दोघांची भांडणे मिटवण्यात आली.पण हाच राग मनात धरून चव्हाण यांनी आज मयूरला बोलवून खोतवाडी जवळील असणाऱ्या महादेव मंदिर जवळ मयूर कांबळेवर डोक्यावर हातावर पायावर सुमारे २२ वार करण्यात आले असल्याचे समजते आहेत.या घटनेची माहिती भागातील त्याच्या मित्रांना कळताच त्यांनी मयूरला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू केले.घटनास्थळी शहापूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला असून उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीच्या शोधासाठी चार पदके रवाना करण्यात आले आहे. अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत.इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर मयूरच्या मित्रमंडळी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

error: Content is protected !!