राजनंदनी संकपाळ शटल रिले स्पर्धेत प्रथम

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

मौजे आगर ता शिरोळ येथील माजी सरपंच सौ अनुसया चव्हाण व दूधगंगा नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाळू चव्हाण यांची नात कु राजनंदनी प्रमोद संकपाळ हिने पुढारी आयोजित महिला क्रीडा स्पर्धेत शटल रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक तर ३० मीटर धावणे स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांकाने यश मिळवले आहे. ज्योतिर्लिंग विद्या मंदिर कोल्हापूर येथे शिकत असलेल्या राजनंदनी संकपाळ हिने पुढारी आयोजित महिला अथलेटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत नावलौकिक मिळवला आहे.तिला शिक्षक श्री देसाई व श्री कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!