महिलांनी वृद्धांची सेवा करण्याबरोबरच सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करावेत – सौ शुभांगी फल्ले

Spread the love

जय भवानी महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन

शिरोळ / प्रतिनिधी

 

सध्याच्या युगात महिलांनी एकत्र कुटुंबात राहून घरातील वृद्धांची सेवा करण्याबरोबरच आपली मुलं सुसंस्कृत बनतील याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे तसेच बचत गटाच्या माध्यमातून नव उद्योग व व्यवसायाची निर्मिती करून स्वावलंबी बनावे असे आवाहन जय भवानी महिला मंडळाच्या अध्यक्षा व माजी ग्रामपंचायत सदस्या सौ शुभांगी फल्ले यांनी केले.

 

शिरोळ येथील रुक्मिणी पांडुरंग माने, (रहिमतपुरकर) कन्या विद्यालय येथे जय भवानी महिला मंडळाच्यावतीने तिळगुळ वाटप व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या
या समारंभात डॉ पायल माने यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले सौ मीना इंगळे (शिराळा) यांनी मासिक पाळी वेळी घ्यावयाची दक्षता व घरगुती उपाय याविषयी मार्गदर्शन केले.

 

सौ ज्योत्स्ना यादव यांनी अध्यात्मिक विषयावर मार्गदर्शन केले तर सौ स्वाती सुतार यांनी घरगुती उद्योगाची माहिती उपस्थित महिलांना दिली या कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या विजयत्या स्पर्धकांना बक्षीस म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या स्वागत सौ निशा चिकोडे यांनी केले आभार मेघा लोंढे यांनी मानले.

 

या समारंभास माजी नगरसेविका सौ अनिता संकपाळ, सुनीता आरगे, विदुला यादव, गायत्री मुळीक,दीप्ती काळे, माया गायकवाड,जयश्री चिकोडे,अनुराधा लोंढे,रूपाली जाधव, सोनाली पिसाळ,आदिती चिकोडे, मनीषा फल्ले, रिया कोळी,वैशाली जाधव,जयश्री गायकवाड,दीपा चिकोडे, सुवर्णा जाधव, अंजना पाटील, रूपाली सुतार पौर्णिमा सुतार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!