आमदार यड्रावकर यांची फलंदाजी तर क्रीडा मंत्री बनसोडे यांचे यष्टीरक्षण

Spread the love
जयसिंगपूर येथे नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू स्टेडियमला क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी येथील खेळाडूंसोबत क्रिकेटचा आनंद घेतला.खेळाडूंनी टाकलेल्या गोलंदाजीवर त्यांनी उत्तम फलंदाजी तर केलीच शिवाय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे फलंदाजी करीत असताना यष्टीरक्षणही केले. क्रीडा क्षेत्रात उत्तम करिअर आहे.शिरोळ तालुक्यातील खेळाडूंनी जिद्द,परिश्रम व सरावात सातत्य ठेवून सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांच्याप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवावे, अशा सदिच्छा त्यांनी या खेळाडूंना दिल्या.
error: Content is protected !!