दत्तभक्त सुकुमार नरसाप्पा नांद्रेकर यांचे निधन

Spread the love

कवठेसार / प्रतिनिधी

येथील दत्तभक्त सुकुमार नरसाप्पा नांद्रेकर (वय७५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.ते स्वर्गीय दे भ रत्नाप्पांना कुंभार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.त्यांनी रत्नाप्पाण्णा कुंभार व त्यांच्या पत्नी पार्वती कुंभार या दांपत्याचा फोटो आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या खिशाला लावून होते.तसेच पंचगंगा साखर कारखान्यास आजतागायत ऊस पुरवठा करून आपली अण्णांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख कायम राखली.
‘कार्य कर्ता असावा तर सुकुमार नांद्रेकर यांच्या सारखा निष्ठावंत असावा ‘असे गौरव उदगार नामदार हसन मुश्रीफ यांनी पंचगंगा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रसंगी केले होते.कावीळ आजारावर आयुर्वेदिक औषधात त्यांचा हातखंडा होता.परिसरातील हजारो कावीळ रुग्णांना आपल्या औषधाने त्यांनी बरे केले होते. ते दत्तभक्त होते.भगवे वस्त्र परिधान करायचे.नेहमी भक्तीत रममाण असायचे.त्यांच्या पश्चात पत्नी,पुतण्या, भाऊ आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार (दि28) रोजी सकाळी 9 वाजता कवठेसार येथे आहे.

error: Content is protected !!