उदय ताकभाते यांना सलग चौथ्या वर्षी पुरस्कार

Spread the love

इचलकरंजी / प्रतिनिधी

रियल इस्टेट क्षेत्रात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा प्लॅटिनम पुरस्कार इचलकरंजीचे सुपूत्र उदय महेश ताकभाते यांना सलग चौथ्या वर्षी प्राप्त झाला आहे.२०२३ सालातील पुरस्कारांचे वितरण ब्रॅम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांच्या हस्ते नुकतेच झाले. कॅनडाच्या रियल इस्टेट क्षेत्रातील आघाडीच्या सेंच्युरी २१ या कंपनीच्या मॉर्गेज विभागाचे प्रमुख गॅरी संधू व त्यांचे सहकारी नवीत यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. उदय ताकभाते यांची Key2GTA या नावाने पार्टनरशीप फर्म आहे. दिलीप पाटील व विप्लव मुजुमदार हे अन्य दोन सहकारी आहेत. या तिघांनाही प्लॅटिनम पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याशिवाय फर्मलाही हा पुरस्कार मिळाला आहे. उदय ताकभाते यांनी सलग चौथ्या वर्षी प्लॅटिनम पुरस्कार पटकावण्याचा विक्रम केला आहे.याबद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!