बलात्कार केल्याप्रकरणी युवका विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात (पोक्सो) गुन्हा दाखल

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी युवका विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल झाला आहे.याबाबतची फिर्याद पिढीत मुलीच्या आईने पोलिसांत दिली आहे.दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.संशयित आरोपी हा पिढीत अल्पवयीन मुलीच्या ओळखीचा असून जुलै व ऑगस्ट महिन्यात घरात येवून बलात्कार केला आहे. त्यामुळे मुलगी गर्भवती राहील्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करीत आहेत.

error: Content is protected !!