व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी संतोष तारळे उपाध्यक्षपदी अतुल भोजणे

Spread the love

व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी संतोष तारळे

उपाध्यक्षपदी अतुल भोजणे, संजय गायकवाड, सेक्रेटरीपदी कुलदिप कुंभार

– कोल्हापूर जिल्हा प्रवक्ता म्हणून डॉ दगडू माने यांची निवड

शिरोळ / प्रतिनिधी
राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी पत्रकार संतोष तारळे तर उपाध्यक्षपदी अतुल भोजणे व संजय गायकवाड तर सेक्रेटरीपदी कुलदीप कुंभार यांची निवड करण्यात आली.
दरम्यान , व्हाईस ऑफ मिडियाच्या जिल्हा प्रवक्ता पदी शिरोळचे जेष्ठ पत्रकार डॉ दगडू माने यांची निवड जाहीर करण्यात आली. शिरोळ तालुक्यामध्ये व्हाईस ऑफ मीडियाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले .
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून देशभरामध्ये पत्रकारिता आणि पत्रकारांची टीम ‘व्हाईस ऑफ मीडिया’ च्या माध्यमातून एकसंघ काम करीत आहे. जो पत्रकार आज पत्रकारितेचा कणा, चौथा स्तंभ, पत्रकारितेला, लोकशाहीला मजबूत ठेवण्याचे काम करतो,अशा पत्रकारांना संघटनेत काम करण्याची संधी देण्यात येत आहे. अशाच पद्धतीने शिरोळ तालुक्यातील पत्रकारांची संघटना बांधून व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नूतन सदस्य सुरेश कांबळे, गणपती कोळी, संदीप अडसूळ, राहुल चौगुले, इसाक नदाफ, प्रल्हाद साळुंखे आदि पत्रकार उपस्थित होते.

error: Content is protected !!