सहकार महर्षि स्व. दत्ताजीराव कदम (आण्णा) यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन

Spread the love

सहकार महर्षि स्व. दत्ताजीराव कदम (आण्णा) यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन

शिरोळ / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, विविध सहकारी संस्थांचे संस्थापक आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार सहकार महर्षी स्व.दत्ताजीराव बाबूराव कदमआण्णा यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या स्व.कदम आण्णांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली.याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व.कदमआण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.त्याचप्रमाणे स्व.सा.रे.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक इंद्रजित पासगोंडा पाटील
यांनी, स्व.दिनकरराव यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक बसगोंडा मलगोंडा पाटील यांनी व स्व.विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शेखर कलगोंडा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, निजामसो पाटील, विजय सुर्यवंशी, दरगू माने-गावडे, कामगार प्रतिनिधी प्रदिप बनगे, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार गुरुजी, रावसाहेब चौगुले, आप्पासाहेब मगदूम, उल्हास पाटील, अजिंक्य पाटील, किरण पाटील-कणंगलेकर तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील, सचिव अशोक शिंदे यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. त्याचप्रमाणे कामगार सोसायटी, कामगार कल्याण मंडळ, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ या संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि कारखान्याचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!