जयसिंगपूरात सिद्धेश्वर मंदिराच्या फुटपाथवर बेवारस आढळला मृतदेह

Spread the love

जयसिंगपूरात सिद्धेश्वर मंदिराच्या फुटपाथवर बेवारस मृतदेह आढळला

जयसिंगपूर :

शहरातील सिद्धेश्वर मंदिर फुटपाथवर अंदाजे 45 वर्षे वय असलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र या बेवारस मयत व्यक्तीचे नाव, गाव, नातेवाईक याची माहिती मिळून आलेली नाही.पोलिसांमध्ये अकस्मात मयत सीआरपीसी 174 प्रमाणे मयत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंगाने सावळा, डोक्याला काळे पांढरे केस, काळी पांढरी बारीक दाढी, उंची 5 फूट 4 इंच, अंगात केसरी रंगाचा फॉर्मल शर्ट आणि त्यावर चॉकलेटी रंगाचे हाफ स्वेटर व काळया रंगाची पॅन्ट असे या मयत व्यक्तीचे वर्णन असून सदर व्यक्तीस कोणी ओळखत असेल तर तात्काळ जयसिंगपूर पोलीस ठाणे ( 02322 – 225333 ) यावर संपर्क करावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांनी केले आहे.

error: Content is protected !!