मजरेवाडी केंद्रांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा विषयी मुख्याध्यापक सहविचार सभा संपन्न
कुरुंदवाड /
येथील कन्या विद्या मंदिर नं.१ येथे मजरेवाडी केंद्रातील मुख्याध्यापकांची माझी शाळा,सुंदर शाळा या विषयांवरील सहविचार सभा संपन्न झाली.
सदर सहविचार सभेत शालार्थ प्रमुख संजय बापू गायकवाड व केंद्रीय प्रमुख दत्तात्रय जाधवर यांनी मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या अभियानाची माहिती दिली.अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत सखोल मार्गदर्शन केले.सदर सहविचार सभेसाठी जिल्हा परिषदेचे १२ तर खाजगी शाळेचे १६ मुख्याध्यापक उपस्थित होते.