समर गीत गायन स्पर्धेत शर्वरी पाटील प्रथम

Spread the love

समर गीत गायन स्पर्धेत शर्वरी पाटील प्रथम

कुरुंदवाड / प्रतिनिधी

 

पत्रकार दिनानिमित्त येथील नगर वाचनालयातर्फे कुरुंदवाड मधील जिल्हा परिषद सर्व प्राथमिक विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांचे समर गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये येथील कुमार विद्यामंदिर नंबर तीन मध्ये इयत्ता दुसरीतील कु.शर्वरी राजगोंडा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

 

पत्रकार दिनानिमित्त कुरुंदवाड येथील नगर वाचनालयाचे वतीने कुरुंदवाड शहरातील पहिली ते चौथीच्या सर्वच जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचे समरगीत, कथाकथन आणि एकपात्री अभिनय यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

 

त्यामध्ये कुरुंदवाड मधील सर्व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांमधून शर्वरी राजगोंडा पाटील हिने प्रथम, प्राथमिक विद्यामंदिर मधील राजवर्धन अमित पाटील हा द्वितीय तर कुमार विद्यामंदिर नंबर तीन मधील काव्यांजली अश्विन गवंडी हिने तृतीय क्रमांक पटकाविले.

 

या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रवीकुमार पाटील आणि वर्गशिक्षक किरण माने यांचे मार्गदर्शन लाभले होते.

error: Content is protected !!