“क्राईम” गावठी कट्ट्यातून गोळी झाडून लॉज मालकाचा खून

Spread the love

कोल्हापुरातल्या दोनवडेत लॉज मालकाचा गोळी झाडून खून

आर्थिक देवघेवीच्या वादातून घडला प्रकार
आर्थिक देवघेवीतून करवीर तालुक्यातल्या दोनवडे येथे शनिवारी रात्री लॉज मालकावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून करण्यात आला.चंद्रकांत आबाजी पाटील असं मृताचे नाव आहे.सचिन शामराव जाधव आणि दत्तात्रय कृष्णात पाटील लॉजिंग मध्ये आल्यानंतर चंद्रकांत यांच्याबरोबर दोघांची बाचाबाची सुरू झाली.आवाज ऐकून चंद्रकांत यांचा मुलगा रितेश घटनास्थळी आला इतक्यात एकाने चंद्रकांत पाटील यांच्यावर गोळी झाडली, डोळ्यादेखत वडिलांचा खून झाल्याने रितेश भीतीने गांगावरून गेला.चंद्रकांत पाटील यांचा खून करून दोघेही संशयीत आरोपी करवीर पोलिसात स्वतः हजर झाले.आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून झाल्याचा पोलिसांनी वर्तवलाय.पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना घटनास्थळावर आणून घटनेचा पंचनामा केलाय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
error: Content is protected !!