शिरटी / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील शिरटी येथील कुमार व कन्या विद्या मंदिर यांच्या वतीने लहान मुलांना पैशांचे व्यवहार कळावे व व्यवहार कसे करावे. प्रत्यक्ष अनुभवातून दैनंदिन व्यवहार कळावे यासाठी आठवडे बाजार भरविण्यात आला होता.हा आठवडी बाजार शुक्रवारी दुपारी चार
वाजता शाळेच्या पटांगणात भरविण्यात आला होता.यावेळी बाजाराचे उद्घाटन आप्पासो उपाध्ये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बाजाराची सुरुवात झाली.यावेळी माजी सरपंच राहुल सुर्यवंशी,शहाजी भोसले,सचिन उदगांवे, अभिजीत शिरगावे,अभिजीत होरे,शुभम भोसले, उपस्थित होते, चिमुकल्यांचे पालक आदी मान्यवर यांच्या हस्ते संपन्न झाले.त्यानंतर बाजार खरेदीसाठी सुरुवात झाली.लहान मुलांनी सर्व प्रकारचा भाजीपाला,विविध खाद्यपदार्थ, शालेय उपयोगी वस्तू, आदींसह सहभाग नोंदविला होता. गावातील दर वर्षी भरलेल्या या बाजाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. प्रत्यक्ष दुकानदार होऊन आपल्या जवळील भाजी पाला विकून परिश्रमाने रूपये कमविल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुमार विद्यामंदिर चे मुख्याध्यापक आनंदा कामत, अध्यापक विजयकुमार चौगुले, प्रकाश वाघीरे, अध्यापिका सुनिता कोळी, व कन्या विद्या मंदिर चे मुख्याध्यापक राजेशकुमार यादव अध्यापिका वर्षा सुर्यवंशी,प्रियांका माळी, यांनी यशस्वी केले, बालगोपालांचा हा आगळावेगळा बाजार सर्वांसाठी आनंददायी ठरला. पालकांनी व गावकऱ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला व या उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले.